UP Woman Elopes With Beggar: उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक ३६ वर्षीय महिला एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. भिकाऱ्यासह पुढील आयुष्य घालविण्यासाठी या महिलेने सहा मुलांना वाऱ्यावर सोडून पळ काढला. यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८७ नुसार गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध सुरू केला. पतीने आरोप केला की, पत्नीने पळून जात असताना घरातील पैसेही चोरून नेले आहेत.

४५ वर्षीय पतीचे नाव राजू असल्याचे सांगितले जाते. राजू हरदोई जिल्ह्यातील हरपालपूर भागात पत्नी राजेश्वरी आणि सहा मुलांसह राहत होता. राजूने दिलेल्या तक्रारीनुसार, नन्हे पंडीत नावाचा इसम त्यांच्या घराजवळ अनेकदा भीक मागण्यासाठी येत असे. पंडीत हात पाहण्याचेही काम करायचा. त्याचे आणि राजेश्वरीचे अनेकदा संवाद व्हायचा. तसेच त्यांनी एकमेकांना फोन नंबर दिला होता. फोनवरूनही ते अधूनमधून बोलायचे.

हे वाचा >> Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

“३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राजेश्वरीने मुलगी खुशबूला सांगितले की, ती बाजारात भाजीपाला आणण्यासाठी जात आहे. जेव्हा ती वेळेत परतली नाही, तेव्हा मी तिचा सगळीकडे शोध घेतला. पण ती कुठेच आढळून आली नाही. आमची म्हैस विकल्यानंतर आलेले पैसे मी घरात ठेवले होते, हे पैसे घेऊन माझ्या पत्नीने पळ काढल्याचे माझ्या नंतर लक्षात आले. मला नन्हे पंडीतवर संशय आहे, त्यानेच माझ्या पत्नीला पळवले असेल”, अशी कैफियत राजूने आपल्या तक्रारीत मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा कुमारी यांनी सांगितले की, राजूच्या तक्रारीनंतर त्यांनी राजेश्वरी आणि नन्हे पंडीत यांचा शोध सुरू केला आहे. सदर महिलेचे अपहरण झाले की स्वतः पळून गेली, याचा शोध घेतला जात आहे.