जिल्हा प्रशासनाकडून कर्जवसुलीचा आढावा; दुसऱ्या बँकेत विलीनीकरणाचाही पर्याय
पेण अर्बन बँकेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाच्या नियुक्तीनंतर आता बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
पेण अर्बन बँक विशेष कृती समितीच्या बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत बँकेच्या पुनरुज्जीवनासाच्या दृष्टीने काय प्रयत्न करण्यात येतील याचा आढावा घेण्यात आला. तसेच बँकेचे पुनरुज्जीवन करणे शक्य नसल्यास दुसऱ्या सक्षम बँकेत बँकेचे विलीनीकरण करण्यात येऊ शकते का, या विषयावरही चर्चा करण्यात आली.
पेण अर्बन बँक गरव्यवहारप्रकरणी करावयाची कारवाई व कर्जवसुली यांचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती समिती स्थापन केली आहे. या समितीची बठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, साहाय्यक सरकारी वकील वैभव भोळे, पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव, बँकेचे प्रशासकीय अधिकारी यासंह संघर्ष समितीचे पदाधिकारी, सहकारी संस्था साहाय्यक निबंधक उपस्थित होते. या बठकीला रिझव्‍‌र्ह बँक व सीबीआयच्या प्रतिनिधींना हजर राहणे गरजेचे होते. विशेष कृती समितीने या बठकीचे निमंत्रणही संबंधितांना पाठविले होते. रिझव्‍‌र्ह बँक व सीबीआयने आत्तापर्यंत या गरव्यवहारप्रकरणी काय कारवाई केली याचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र रिझव्‍‌र्ह बँक व सीबीआयचे प्रतिनिधी या बठकीला गरहजर राहिले.
गरव्यवहारातील रक्कम ५९८ कोटी ७२ लाख वसूल करून बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे. बँकेचे कर्जदार व त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्ता जप्त करणे, त्यांची विविध बँकेतील खाती गोठविणे.
पोलीस स्टेशन व केंद्रीय गुप्तचर विभागांनी केलेल्या तपासकामाचा आढावा घेणे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पेण अर्बन बँकेच्या कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम पुन्हा पेण अर्बन बँकेकडे व्याजासह जमा करण्यासंबंधी करावयाची कार्यवाही करणे. तसेच बँकेचे पुनज्र्जीवन करणे शक्य नसल्यास दुसऱ्या सक्षम बँकेत बँकेचे विलीनीकरण करणे आदी विषयांवर या सभेत चर्चा झाली. पेण अर्बन बँकेच्या गरव्यवहारप्रकरणी विशेष तपास पथकाने आता कर्जदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. २) पथकाने प्रतोष सिंग व शांताराम पाटील या दोन कर्जदारांना अटक केली. याप्रकरणी आत्तापर्यंत ५५ जणांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movements for pen urban bank revival
First published on: 28-05-2016 at 02:11 IST