संसदेच्या सुरक्षाभंगावरून लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेतील १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. याविरुद्ध विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याणी बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करत खिल्ली उडवली आहे. तर, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. त्यावरून जगदीप धनखड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

खासदारांच्या निलंबनाविरोधात संसदेच्या बाहेर विरोधी पक्षातील सदस्यांनी निदर्शने करत होते. यावेळी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करत खिल्ली उडवली. तेव्हा, पायऱ्यांवर बसलेले सदस्यांमध्ये एक हशा पिकला होता. तर, राहुल गांधी कल्याण बॅनर्जी यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

“हा सभागृहाचा अपमान”

हाच व्हिडीओ जगदीप धनखड यांनी माध्यमांमध्ये पाहिला. यानंतर राज्यसभेत बोलताना जगदीप धनखड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींना सुनावलं आहे. जगदीप धनखड म्हणाले, “एक खासदार नक्कल करत आहेत, तर दुसरे मोठे नेते त्याचं चित्रीकरण करत आहे. हे लाजीरवाणे, हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. हा सभागृहाचा अपमान असून थोडी तरी सद्बुद्धी त्यांना मिळावी.

भाजपानं या घटनेचा व्हिडीओ ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर शेअर केला आहे. त्यावर लिहिलं, “विरोधी खासदारांना निलंबित का करण्यातं आलं? हा प्रश्न देशाला पडला आहे. तर, त्याचं हे कारण आहे. खासदार कल्याण बॅनर्जी उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवत आहे. तर, राहुल गांधी याचा आनंद लुटत आहेत. हा सभागृहाचा अपमान आहे.”