प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करत संदर्भात माहिती दिली आहे. तसेच या बाळांची नावं ठेवण्यात आली असल्याचेही या परिपत्रकातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘मुंबई इंडियन्स’नंतर मुकेश अंबानींना हवीये ‘लिव्हरपूल’चीही मालकी! फुटबॉल क्लबकडे केली विचारणा

“आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, शनिवारी ( १९ नोव्हेंबर रोजी) आमची मुलगी ईशाने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. मुलीचे नाव अदिया आणि तर मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले”, अशी माहिती या परिपत्रकातून देण्यात आली आहे.

हेही वाचा – १३४८ कोटींचं घर! अंबानींची दुबईत ‘दिवाळी शॉपिंग’; या वर्षातील दुबईमधील दुसरी घरखरेदी, नव्या घराचं कुवैतशी खास कनेक्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ डिसेंबर २०१८ रोजी ईशा अंबानी यांचे लग्न पिरामल ग्रुपचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले होते. देशातल्या सर्वात महागडल्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. या विवाह सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.