रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अतिमहत्वाच्या व्यक्तींना असलेली झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी यांना असलेला धोका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने अंबानी यांच्या सुरक्षेसाठी कमांडो पथकर देण्यास मान्यता दिली. अंबानींच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे देण्यात आली आहे. झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत पायलट कार, त्यापाठोपाठ सशस्त्र कमांडो असतील. सुरक्षा संस्थांनी आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अंबानींना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सीआरपीएफचे २८ जणांचे पथक अंबानींच्या सुरक्षा व्यवस्थेत असेल. जम्मू काश्मिर आणि पंजबमध्ये सरकारच्या उच्चपदस्थांना असलेल्या सुरक्षेप्रमाणे एखाद्या खासगी व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी पहिल्यांदाच केंद्रीय राखीव पोलीस दलाला देण्यात आली आहे. नुकतेच अंबानी यांच्या कार्यालयाने इंडियन मुजाहिद्दीनकडून धमकीचे पत्र आल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2013 रोजी प्रकाशित
मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अतिमहत्वाच्या व्यक्तींना असलेली झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी यांना असलेला धोका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने अंबानी यांच्या सुरक्षेसाठी कमांडो पथकर देण्यास मान्यता दिली. अंबानींच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे देण्यात आली आहे.

First published on: 22-04-2013 at 02:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani gets z plus security cover