भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी हे जगातील तेराव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे १३ व्या क्रमाकांवर आहेत. मागील वर्षी मुकेश अंबानी १९ व्या स्थानी होते. ते आता १३ व्या स्थानी आले आहेत २०१७ मध्ये फोर्ब्सची जी यादी जाहीर झाली होती त्यात मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावर होते. सध्या भारतात १०६ श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यापैकी मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

२०१८ मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती ४०.१ अब्ज डॉलर एवढी होती ती आता ५० अब्ज इतकी झाली आहे. मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचा क्रमांक १३४९ वा आहे. तर विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी हे ३६ व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती २२.६ अब्ज डॉलर इतकी आहे. तर एचसीएलचे सह संस्थापक हे ८२ व्या क्रमांकावर आहेत. तर लक्ष्मी मित्तल ९१ व्या क्रमांकावर आहेत. बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला १२२ व्या स्थानी आहेत. भारती एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल २४४ व्या क्रमांकावर आहेत. तर पतंजली आयुर्वेद चे सह संस्थापक आचार्य बाळकृष्ण हे ३६५ व्या स्थानावर आहेत.