मुकेश अंबानी हे नाव आता फक्त भारतच नाही तर जगभरात सर्वश्रुत झालं आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील घराची गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मुकेश अंबानींचं मुंबईतील आलिशान अँटिलिया हाऊस अजूनही उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरत असताना आता त्यांच्या लंडनमधील घराचीही चर्चा सुरू झाली आहे. लंडन्या बकिंगहॅमशायरमध्ये त्यांनी तब्बल ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली असून तिथल्या आलिशान घरात मुकेश अंबानी लवकरच शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर खुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

मिड-डेनं दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी लवकरच सहकुटुंब लंडनला वास्तव्यास जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. बकिंगहॅमशायरमघील स्टोक पार्क या ठिकाणी ही मालमत्ता असून या घरात तब्बल ४९ बेडरुम असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या घरात अत्याधुनिक उपचार सुविधा देखील उपलब्ध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ऐन लॉकडाऊनच्या मध्यावर मुकेश अंबानींनी लंडनमध्ये तब्बल ५९२ कोटींना ही मालमत्ता खरेदी केली आहे.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्टेटमेंट जारी

दरम्यान, या चर्चेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक आणि त्यांचे कुटुंबीय लंडन किंवा जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही स्थलांतरीत होणार नाहीत. स्टोक पार्क इस्टेटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं नुकत्याच खरेदी केलेल्या मालमत्तेचा मुख्य हेतू हा तिथे अत्याधुनिक सुविधांचं गोल्फ क्लब आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट सुरू करणे हा आहे”, असं रिलान्सय इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Namaste London! ३०० एकरची मालमत्ता, ४९ बेडरुम आणि हॉस्पिटल; मुकेश अंबानी कुटुंबाचा नवीन महाल

“रिलायन्स ग्रुपच्या वेगाने वाढणाऱ्या व्यवसायामध्ये या मालमत्तेचं अधिग्रहण ही एक जमेची बाजू असेल. त्यासोबतच, भारतातील प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा जागतिक स्तरावर विस्तार यामुळे साध्य होऊ शकेल”, असं देखील रिलायन्सकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.