scorecardresearch

‘मोदी हे धर्मनिरपेक्ष कोंडाळ्याचे बळी’ – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्तेतच असलेल्या सत्तेच्या दलालांचे कंबरडे मोडले.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या २० वर्षांपासून धर्मनिरपेक्षवाद्यांच्या कोंडाळ्याचे आणि असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत तरीही देशात त्यांनी विकासाचे कार्यक्रम ज्या वेगाने हाती घेतले आहेत त्यामध्ये बाधा आलेली नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने ते विकासाचा चेहरा होते आणि आता पंतप्रधान म्हणून ते गरीब आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहेत, असे नक्वी म्हणाले.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्तेतच असलेल्या सत्तेच्या दलालांचे कंबरडे मोडले, त्यांच्याकडे देशाच्या विकासाचा निश्चित कार्यक्रम आहे आणि ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांच्या ते पचनी पडत नाही, असेही नक्वी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukhtar abbas naqvi comment on narendra modi

ताज्या बातम्या