मुंबई : मुंबई विमानतळावरून न्यू जर्सीतील न्यूयॉर्क येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला २७ तास विलंब झाला असून त्यामुळे या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हे विमान शनिवारी पहाटे चार वाजता उड्डाण करणार असल्याची माहिती एअर इंडियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एअर इंडियाचे १९१ विमान मुंबई ते न्यूयॉर्क विमान शुक्रवारी पाहाटे दीड वाजता उड्डाण करणार होते, मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. या विमानातून प्रवास करण्यासाठी ११० प्रवासी विमानतळावर येऊन पोहोचले होते. विमानतळावर सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अचानक विमानाचे उड्डाण पुढे ढकलल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांना तेथेच ताटकळावे लागले. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. न्यूयॉर्कला जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था होणार की नाही, याचीही कल्पना देण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’