Murder For Property ५७ वर्षांची एक महिला घरमालकाच्या प्रेमात पडली. त्या दोघांमध्ये मागच्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंधही निर्माण झाले होते. मात्र महिलेच्या मनात आलेला मालमत्ता हडप करण्याचा मोह प्रेमापेक्षा मोठा ठरला. त्यामुळे या महिलेने तिच्याच घरमालकालाच जाळून मारलं. हरिहर साहू या ७२ वर्षीय घरमालकाचा या जळीतकांडात मृत्यू झाला. ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी ही घटना घडली आहे. ज्यानंतर पोलिसांनी सुदेष्णा जेना या महिलेला अटक केली.साहू यांना जळालेल्या अवस्थेत रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी काय माहिती दिली?

सुदेष्णा ही विधवा होती. ती हरिहर साहूच्या घरात भाडे तत्त्वावर राहू लागली. हरिहर साहू हे सेवानिवृत्त महसूल निरीक्षक होते. या दोघांमध्ये मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण हरिहर यांच्या मृत्यूनंतर सगळी मालमत्ता आपल्यालाच मिळेल या लोभातून सुदेष्णाने हरिहर यांना जाळून मारलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरवणा विवेक यांनी दिली. तिने साहू यांना पेटवून दिलं पण दोन अज्ञातांनी त्यांना पेटवलं आहे आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव रचला होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदेष्णाने साहू यांनी कसं ठार केलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटेच्या सुमारास सुदेष्णा साहू यांच्या खोलीत गेली. साहू त्यांच्या खोलीत झोपले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर सुदेष्णाने रॉकेल ओतलं आणि त्यांना पेटवून दिलं. साहू यांना जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं सुरुवातीला बेहरामपूर आणि नंतर कटक या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. मात्र कटक येथील रुग्णालयात डॉक्टरांनी साहू यांना मृत घोषित केलं. सुदेष्णाने हरिहर साहू यांना मारण्याचा कट आधीच डोक्यात आखला होता. कारण तिने साहू यांचा मोबाईल फोन फेकून दिला आणि तसंच ज्या बाटलीतून रॉकेल आणलं होतं ती बाटलीही आगीत फेकून दिली. साहू यांना दोन अज्ञातांनी पेटवून दिलं आहे असा बनाव तिने रचला आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते असंही तिने शेजाऱ्यांना भासवलं. पण पोलिसांनी जेव्हा तिची कसून चौकशी केली तेव्हा तिने गुन्हा कबूल केला.