उत्तर प्रदेशच्या कनोज जिल्ह्यात घरगुती भांडणातून एका व्यक्तीनं पत्नी आणि सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याने दोघींनाही गच्चीवरून खाली फेकून दिलं. या घटनेनंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देत गुन्हाही कबूल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कनौज जिल्ह्यातील हौदापूर्वा गावच्या पवन नावाच्या व्यक्तीचं २०१४ मध्ये कानपूर शिवराजपूरच्या सविता यांच्यासोबत लग्न झालं होतं. सुरूवातीच्या दिवसात सर्व काही ठिक सुरू होतं. काही दिवसानंतर दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. पवन त्यांची सासू कलावती यांना या भांडणांसाठी कारण मानत असे. काही दिवसांपूर्वी कलावती या पवन यांच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात भांडणाला सुरूवात झाली.

घरगुती भांडणाला कंटाळून पवन यांनी मध्यरात्री पत्नी आणि सासूवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर दोघींची हत्या केली. दोघींना घराच्या गच्चीवर नेऊन खाली फेकलं. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये जावून गुन्ह्याची कबूली दिली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा- अरेच्चा, हे काय! पती भांडणच करत नाही म्हणून महिलेनं मागितला घटस्फोट

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आधी संध्याकाळी पत्नी आणि सासूने पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पवन विरोधात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही. त्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली, असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या कनोज जिल्ह्यात घरगुती भांडणातून युवकाने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याने दोघींनी गच्चीवरून खाली फेकून दिले. यात दोघींता मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची माहिती देत  गुन्हा कबुल केला.

आणखी वाचा- नाकाबंदीत पोलिसांनी मागितलं ID, एका फोनवर त्याने परिसराचा वीजपुरवठाच खंडित केला

कनौज जिल्ह्यातील हौदापूर्वा गावच्या पवनचे लग्न २०१४ साली कानपूर शिवराजपूरच्या सविता सोबत झाले होते. सुरूवातीच्या दिवसात सर्व काही ठिक सुरू होतं. काही दिवसानंतर दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. पवन त्याची सासू कलावती यांनी या भांडणांसाठी कारण मानत असे. काही दिवसांपूर्वी कलावती या त्याच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात भांडणाला सुरूवात झाली.

घरगुती भांडणाला कंटाळून युवकाने मध्यरात्री पत्नी आणि सासूवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर दोघांची हत्या केली. दोघांना घराच्या गच्चीवर नेवून खाली फेकले यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर आरोपीने पोलिस स्टेशन मध्ये जावून गुन्ह्याची कबुली दिली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आधी संध्याकाळी पत्नी आणि सासूने पोलिस स्टेशनमध्ये आरोपी पवन विरोधात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही. त्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of wife and mother in law in a domestic dispute abn
First published on: 21-08-2020 at 15:37 IST