मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदचा बचाव करताना पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना दहशतवाद्याशी केली आहे. सईदच्या अटकेची मागणी करणारे राष्ट्रीय स्वयंसेव संघ(आरएसएस) आणि बाळ ठाकरेंबद्दल का बोलत नाहीत? ते दहशतवादी नव्हते का? असा सवाल मुशर्रफ यांनी उपस्थित केला आहे.

तुरुंगातून बाहेर येताच थेट ‘मातोश्री’वर पोहोचला होता संजय दत्त, बाळासाहेबांना मिठी मारली अन्…

एवढेच नाही तर भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी तयार केल्याची कबुली देत हाफीज सईद हा आमचा हीरो असल्याचे खळबळजनक वक्तव्य मुशर्रफ यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. हाफीज सईद, आरएसएस आणि बाळ ठाकरे हे सारखेच आहेत. बाळासाहेब ठाकरे हे जर भारतात हीरो असतील तर पाकिस्तानात हाफीज सईद देखील आमचा हीरो आहे, असे मुशर्रफ म्हणाले. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना, गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने केलेला विरोध हा दहशतवादी नाही का? खुर्शीद यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घातलेला गोंधळ हा दहशतवाद नाही का? अशा प्रश्नांची सरबत्तीच मुशर्रफ यांनी सुरू केली.