जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी आपली जमीन दान करत एका मुस्लीम कुटुंबाने जातीय सलोख्याचं उदाहरण दिलं आहे. धर्माच्या भिंती ओलांडत बिहारमधील कुटुंबाने तब्बल अडीच कोटींची जमीन विराट रामायण मंदिरासाठी दिली आहे. हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यात हे मंदिर उभारलं जात आहे.

पाटणामधील महावीर मंदिर विश्वस्त मंडळाने या मंदिराचं काम हाती घेतलं आहे. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान केली असून ते उद्योजक आहेत”.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
sukma ram mandir
छत्तीसगडमधील माओवाद्यांनी बंद केलेले राम मंदिर २१ वर्षांनी खुले

“मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या कुटुंबाची जमीन दान करण्यासंबंधीची सर्व औपचारिकता त्यांनी पूर्ण केली आहे,” अशी माहिती माजी आयपीएस अधिकारी कुणाल यांनी दिली आहे. आचार्य यांनी खान यांनी दिलेलं हे दान दोन समाजात असणारा सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हे स्वप्न पूर्ण होणं अशक्य होतं असंही ते म्हणाले.

महावीर मंदिराने आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी १२५ एकर जमीन मिळवली आहे. आता अजून २५ एकर जमीन विश्वस्त मंडळ मिळवणार आहे.

विराट रामायण मंदिर २१५ फूट उंच असलेल्या कंबोडियातील १२ व्या शतकातील जगप्रसिद्ध Angkor Wat संकुलापेक्षा उंच असेल. पूर्व चंपारणमधील संकुलात १८ मंदिरं असतील आणि तेथील शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल. या मंदिराच्या बांधकामाचा अंदाजे खर्च ५०० कोटी आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामात सहभागी तज्ज्ञांसोबत विश्वस्त मंडळ सल्लामसलत करणार आहे.