केरळचे मुख्यंमत्री पिनराई विजयन यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना एक दावा केला आहे. या दाव्यामुळे आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. मल्लपुरम येथे सीएए विरोधी आंदोलनात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारत माता की जय आणि जय हिंद या नाऱ्यांचा शोध मुस्लीम नागरिकांनी लावला. तसेच भाजपा सरकार भारताचा सांस्कृतिक इतिहास पुसून टाकण्याचा आरोप करत आहे, असाही आरोप मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला. यावेळी त्यांनी भारत माता की जय हा नारा कुणी दिला? याबाबत माहिती दिली. मात्र त्याचा ऐतिहासिक पुरावा त्यांनी दिलेला नाही.

मुस्लीम लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व देणे किंवा मुस्लीमांना देशाच्या बाहेर हुसकावण्यासाठी त्यांच्या समुदायाची विशिष्ट ओळख निर्माण करण्याचा उद्देश संघ परिवाराचा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कंगनाविषयी सुप्रिया श्रीनैत यांची अश्लील पोस्ट, राष्ट्रीय महिला आयोगाचं निवडणूक आयोगाला पत्र, केली ‘ही’ मागणी

“आपण पाहिलं की, संघ परिवाराचे नेते येऊन भाषणं करतात. यावेळी उपस्थित लोकांना ते भारत माता की जय, अशा घोषणा देण्यास सांगतात. हा नारा संघ परिवाराशी निगडित व्यक्तीने शोधला आहे का? हा नारा सर्वप्रथम ज्याने दिला, त्या व्यक्तीचे नाव आहे अझिमुल्ला खान. १९व्या शतकात मराठा पेशवे नाना साहेब यांचे ते प्रधान असल्याचा दावाही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला. मुस्लीम नागरिकाने हा नारा शोधल्यामुळे ते कदाचित उद्या हा नारा देणेच बंद करतील का? याबाबत मला तरी कल्पना नाही”, असेही मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले.

तसेच जय हिंद हा नारादेखील मुस्लीम नागरिक असलेल्या अबिद हसन साफ्रानी यांनी दिला असल्याचाही दावा पिनराई विजयन यांनी केला. संघ परिवाराचे जे लोक मुस्लीमांनी हा देश सोडून जावे, असे सांगतात. त्यांनी या ऐतिहासिक सत्याकडे डोळे उघडे ठेवून पाहावे, असेही आवाहन त्यांनी केले. त्यानंतर “सारे जहँ से अच्छा…” हे लोकप्रिय गीत मोहम्मद इक्बाल यांनी रचले असल्याचीही आठवण करून दिली. मुस्लीम शासकांनी आणि इतरांनी भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच मुस्लीमामधील एका मोठ्या वर्गाने स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली, असेही ते म्हणाले.

मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब

पुढे पिनराई विजयन यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. २०१९ साली केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणल्यापासून काँग्रेसला देशव्यापी आंदोल उभे करता आले नाही, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर सीएए कायद्याची अधिसूचना काढल्यानंतरही या विषयावर भूमिका जाहीर करण्यात काँग्रेस पक्षाला अपयश आले आहे, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचे सरकार संघ परिवारच्या उद्देशाचा विरोध करत राहिल. तसेच सीएएची अंमलबजावणी आम्ही होऊ देणार नाही, असेही पिनराई विजयन यांनी जाहीर केले. या कायद्यामुळे संविधानातील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. २०२५ साली राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये फूट पाडणारा उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणला असल्याचेही ते म्हणाले.