भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवत मोदी देशाला स्थिर आणि प्रामाणिक सरकार देऊ शकतात असे विधान केले आहे.
तसेच रामलीला मैदानावर आणि देशभरात विविध जिल्ह्यांमध्ये २३ मार्च रोजी होणाऱया ‘योगा मोहोत्सव’ मध्ये नरेंद्र मोदीही सहभागी होणार असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले. त्याचबरोबर देशात काही वाईट प्रवृत्ती मोदींसमोर अडथळा निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.
बाबा रामदेव म्हणतात की, मोदींना बदनाम करण्यासाठी अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले की जे मुळात खोटे होते. मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी अनेक वाईट प्रवृत्तींनी प्रयत्न केले परंतु, मोदी यासर्वांवर मात करत देशाचे नेतृत्व करतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसवर तोफ डागत बाब रामदेव यांनी आम आदमी पक्षावरही हल्लाबोल केला. काँग्रेस निस्तनाभूत होत असून आम आदमी पक्ष काँग्रेसच्या विचारसरणीने काम करत असल्याचेची बाबा रामदेव म्हणाले.