भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मेहनती नेते असून माझे चांगले मित्र असल्याचे वक्तव्य द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी केले आहे. या वक्तव्याला हाकेच्या अंतरावर येऊ ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्व मिळाले आहे.
करुणानिधी म्हणतात की, नरेंद्र मोदी लोकसभेचा कसून प्रचार करत आहेत. यावरून ते अतिशय मेहनती नेते असल्याचे दिसून येते. ते माझे चांगले मित्रही आहेत. परंतु, निवडणुकींनंतर कोणता पक्ष सत्तेत येईल यावर आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही.
काहीदिवसांपूर्वी करुणानिधींनी जातीयवादी पक्षांसोबत आम्ही कधीच आघाडी करणार नसल्याचे म्हटले होते. यावर याचा कोणत्याही प्रकारचा संबंध भाजपशी नसल्याचेही ते म्हणाले तसेच भाजप जातीयवादी पक्ष नसल्याचेही मत करुणानिधींनी यावेळी व्यक्त केले.