भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले एक अद्भूत छायाचित्र नासाने शेअर केले आहे. सीमारेषेवर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे रात्रीच्या काळोखात भारत-पाक सीमारेषा या छायाचित्रात अगदी स्पष्ट उठून दिसते. नासाच्या एका अंतराळवीराने निकॉन डी४ डिजिटल कॅमेरातून २८ मिलिमीटर लेन्सच्या साहाय्याने हे छायाचित्र टीपले असून ते पाकमधील सिंधू नदीपात्रापासून उत्तर दिशेकडे पाहताना टिपण्यात आले आहे.
छायाचित्रात भारत-पाक सीमा रेषा केशरी रंगात अतिशय ठळकपणे आपल्याला पाहायला मिळते. तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर या छायाचित्रात दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघालेले दिसते. सिंधू नदीपात्र आणि हिमालयाचाही भाग या छायाचित्रात नमूद करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
भारत-पाक सीमेचे नासाने अवकाशातून टिपलेले छायाचित्र. (छाया साभार- नासा)
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa shares stunning photos of the india pakistan border
First published on: 06-10-2015 at 13:49 IST