पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता थोडा कमी होताना दिसत आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतला आहे. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र कारभार स्वीकारण्याची अट घातली आहे. नवीन एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर मी पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन, असे सिद्धू यांचे म्हणणे आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी सरकारच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामा दिला होता. 

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज चंदीगडमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. स्वतः सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याची माहिती दिली. सिद्धू म्हणाले, मी माझा राजीनामा मागे घेत आहे. नवे एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर मी पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी मी राजीनामा मागे घेत असल्याचे सिद्धू म्हणाले.