पदाला न शोभणारे वर्तन करणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी नौदलातील वरिष्ठ अधिकाऱयांना दिलेले असतानाच एक नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नौदलातील अधिकाऱयांची मान शरमेने खाली गेलीये.
कारवारमध्ये नियुक्तीला असलेल्या नौदलातील एका अधिकाऱयाने चक्क स्वतःच्या पत्नीकडे आपल्या सहकारी अधिकाऱयाबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. संबंधित महिलेला तिच्या नवऱयाने मद्यपान करण्याचीही जबरदस्ती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या महिलेने मंगळवारी थेट संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली आणि नवऱयावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. वर्षभरापूर्वीच या महिलेचे संबंधित नौदल अधिकाऱयाबरोबर लग्न झाले. त्यानंतर काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वादविवाद होण्यास सुरुवात झाली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱयांने पत्नीला तिची विवस्त्र छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याचीही धमकी दिली होती, असे या महिलेने सांगितल्याचे समजते. नौदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2013 रोजी प्रकाशित
सहकाऱयाशी शारीरिक संबंध ठेवण्याची नौदल अधिकाऱयाची पत्नीकडे मागणी
पदाला न शोभणारे वर्तन करणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी नौदलातील वरिष्ठ अधिकाऱयांना दिलेले असतानाच एक नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नौदलातील अधिकाऱयांची मान शरमेने खाली गेलीये.
First published on: 15-05-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy officers wife alleges husband forced her to have sex with other officers