भारत आणि इस्राईल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाची नुकतीच यशस्वी चाचणी केली. नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौकेवरुन ही रात्रीच्या सुमारास चाचणी घेण्यात आली. यावेळी हवेतील एका लक्ष्याचा भेद करत असल्याचा व्हिडीओ नौदलाने प्रसिद्ध केला आहे.

Barak 8 क्षेपणास्त्र

जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राला तांत्रिकदृष्ट्या MR-SAM म्हणजेच medium range mobile surface to air missile म्हंटलं जातं, नौदलाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे Barak 8. नौदलाचे हे एक प्रमुख क्षेपणास्त्र असून यामुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडली आहे.

India Ballistic Missile Defence
विश्लेषण :‘आयर्न डोम’ मुळे इस्रायलचा बचाव… भारताकडे कोणती हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली?
Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!

७० किलोमीटर अंतरापर्यंत आणि १६ किलोमीटर उंचीपर्यंतचे कोणतेही लक्ष्य मग ते लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन भेदण्याची क्षमता क्षेपणास्त्रामध्ये आहे. ध्वनीच्या दुप्पट वेगाने संचार करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्राचा मारा चुकवणे अवघड समजले जाते.

नौदलामध्ये हे क्षेपणास्त्र २०१६ मध्ये दाखल झालं असून विविध युद्धनौकांवर तैनात करण्यात आलं आहे. काल रात्री केलेली चाचणी ही नियमित चाचण्यांचा एक भाग होती, शस्त्रसज्जता आणि क्षमता तपासण्याचा हा एक भाग होता.