Nayanthara मद्रास उच्च न्यायालयाने नयनतारा बियाँड द फेअरी टेल या माहितीपटाविरोधान नोटीस बजावली आहे. रजनीकांत यांच्या चंद्रमुखी या चित्रपटातील काही प्रसंग या माहितीपटात बेकायदेशीररित्या वापरण्यात आले आहेत असा आरोप करण्यात आला आहे. ज्यानंतर तुम्ही असं का वागला आहात? असा सवाल न्यायालयाने केला. या माहितीपटात चंद्रमुखी सिनेमातील गाणं आणि प्रसंग वापरल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी तुम्ही दोन आठवड्यांत उत्तर द्या असं न्यायालयाने म्हटलं आहे. नेटफ्लिक्स आणि टार्क स्टुडिओकडून या नोटिशीला कसं उत्तर दिलं जाणार? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.

काय म्हणाले न्यायाधीश सेंथीलकुमार राममूर्ती?

न्यायाधीश सेंथीलकुमार राममूर्ती यांनी या प्रकरणात Tarc Studio LLP आणि नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात दोन आठवड्यांमध्ये उत्तर द्या असंही मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणात एपी इंटरनॅशनलचे चित्रपट वितरण कंपनीने नयनताराच्या माहितीपटाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या माहितीपटात वापरण्यात आलेलं गाणं, काही प्रसंग या सगळ्याचे हक्क राखीव आहेत. आमच्याकडून माहितीपटात ते वापरण्यासाठी संमती घेतलेली नाही. तरीही Tarc LLP ने आमच्या चित्रपटातले काही प्रसंग आणि गाणी नयनतारावरच्या माहितीपटात वापरली आहेत हा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

नयनताराबाबतच्या माहितीपटाचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात

याच याचिकेवर सुनावणी घेत असताना सेंथीलकुमार राममूर्ती यांनी टार्क एलएलपी आणि नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. एवढंच नाही जी याचिका यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे त्यात जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई म्हणून पाच कोटी रुपये दिले जावेत अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणी नेटफ्लिक्स आणि टार्क एलएलपीला नोटीस बजावली आहे. तसंच दोन आठवड्यांत या नोटिशीला उत्तर देण्याच्याही सूचना केल्या आहेत. Live Law ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४ मध्ये प्रदर्शित झाला आहे माहितीपट

नयनतारा फेअरी टेल नावाचा माहितीपट नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विग्नेश सिवन आणि नयनतारा यांचं लग्न, त्याची तयारी, सरोगसीद्वारे नयनताराचं आई होणं या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. मात्र या माहितीपटातली गाणी, काही प्रसंग हे रजनीकांत यांच्या चंद्रमुखी चित्रपटातून घेण्यात आले आहेत ज्यासाठी कुठलीही संमती घेण्यात आलेली नाही. याआधी धनुष या अभिनेत्यानेही नयनताराच्या या माहितीपटाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण चित्रपट वितरकांनी या माहितीपटाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.