Vice Presidential Candidate: भाजपा संसदीय मंडळाची रविवारी संध्याकाळी ६ वाजता बैठक होणार आहे, यामध्ये पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
गुरुवारी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला अंतिम रूप देतील. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.
जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, लल्लन सिंग, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ ऑगस्ट रोजी भारताच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या विशिष्ट तारखांची माहिती दिली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा होता.
या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. याचबरोबर धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले होते. आणि विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, राजीनाम्यात “आपल्याला जे काही दिसत आहे त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी असू शकते.”