चीनमधील काही भागांची टेहाळणी करण्यासाठी अमेरिका गुप्तचर संस्थेच्या(सीआयए) विमानांना भारतीय हद्दीत येण्याची त्याचबरोबर येथे इंधन भरू देण्याची परवानगी त्यावेळीचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर दिली होती. असे आज शुक्रवार काही गुप्त कागदपत्रांमधून स्पष्ट करण्यात आले आहे.
यू-२ या सीआयएच्या टेहळणी विमानांना ११ नोव्हेंबर १९६२ रोजी भारतीय हवाईतळ वापरू देण्यास नेहरूंनी परवानगी दिली होती असे ‘सीआयए’मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
३ जून १९६३ रोजी भारताचे राष्ट्रपती एस.राधाकृष्णन आणि त्यावेळीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत उडीसामधील चारबाटिया या हवाई तळाचा वापर करू देण्यास भारताने मंजूरी दिली होती. परंतु, त्यानंतर या हवाई तळावर अपेक्षित असणाऱया सुधारणा कामांना विलंब झाल्याने थायलंडमधील ताखली येथे सीआयएने नवीन हवाई तळ उघडले असेही सुत्रांनी सांगितले आहे.