प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांची तब्येत नाजूक असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती अध्यक्ष जेकब झुमा यांनी दिली. मंडेला गेले तीन आठवडे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एक राष्ट्र म्हणून प्रार्थना करण्यापलिकडे तसेच ‘मडिबां’च्या तब्येतीत सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यापलिकडे आपल्या हातात काहीही नाही, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान अध्यक्ष जेकब झुमा यांनी दिली. आपण स्वत मंडेला यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सातत्याने माहिती मिळवत आहोत, असेही झुमा यांनी स्पष्ट केले. आफ्रिकेतील राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष सिरील रामाफोसा यांनीही अध्यक्ष झुमा यांच्यासह मंडेला यांच्या तब्येतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.