‘दी क्राऊन’ या नेटफ्लिक्सच्या मालिकेस सात एमी पुरस्कार मिळाले असून या मालिकेने या पुरस्कारात आपली मोहोर उमटवली आहे. उत्कृष्ट नाट्य मालिका, उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही या मालिकेस मिळाले असून राणी एलिझाबेथ २ च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ऑलिव्हिया कोलमन हिला मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅपल  टीव्ही प्लसच्या टेड लासो मालिकेस दूरचित्रवाणी मालिकेत रविवारी रात्री दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून  त्यात जॅसन सुडेकिस यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेस एकूण चार पुरस्कार मिळाले असून केट विन्सलेट अभिनित मारी ऑफ एस्टाऊन, जीन स्मार्ट अभिनित हॅकस या एचबीओ मालिकांनी त्यापाठोपाठ बाजी मारली आहे.

गेल्या वर्षी या पुरस्कारांचा कार्यक्रम आभासी पद्धतीने झाला होता.

या वेळी लॉस एंजलिस येथे हा कार्यक्रम एलए लाइव्ह एंटरटेनमेंट  संकुलात घेण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण सीबीएस व पॅरामाउंट यांनी केले होते. तीन तास हा कार्यक्रम चालला होता. त्याचे संचालन सेंड्रिक  यांनी केले.  ‘दी क्राऊन’ मालिकेने लेखन, दिग्दर्शन हे पुरस्कार पटकावले आहेत. पीटर मॉर्गन अँड कंपनीने तयार केलेल्या या मालिकेने अभिनयाचे सर्व पुरस्कार पटकावले. गिलियन अँडरसनला उत्कृष्ट  सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर टोबियास मेन्झीस यांना उत्कृष्ट  सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. जोश ओ कोनर यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. टेड लासो मालिकेतील फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी सुडेकिस यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट विनोदी मालिकेचा पुरस्कारही या मालिकेस मिळाला आहे. याच प्रवर्गात हना वॅडिंगहॅम व ब्रेट गोल्डस्टेन यांना उत्कृष्ट सहायक अभिनयाचे पुरस्कार मिळाले. मेर ऑफ इस्टटाऊन या गुन्हेगारीविषयक मालिकेला एमीचे तीन अभिनय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात केट विन्सलेटला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

२०२१ चे मानकरी

उत्कृष्ट नाट्य मालिका- दी क्राऊन

उत्कृष्ट मालिका दिग्दर्शन- दी क्राऊन

उत्कृष्ट मालिका लेखन- दी क्राऊन

मालिकेतील उत्कृष्ट अभिनेत्री ओलिव्हिया कोलमन (दी क्राऊन)

मालिकेतील उत्कृष्ट अभिनेता- जोश ओकोनर ( दी क्राऊन)

मालिकेतील उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- गिलीयन अँडरसन ( दी क्राऊन)

मालिकेतील उत्कृष्ट सहायक अभिनेता- टोबियस मेन्झीस ( दी क्राऊन)

उत्कृष्ट विनोदी मालिका- टेड लासो

उत्कृ ष्ट दिग्दर्शन विनोदी मालिका- हॅकस

उत्कृष्ट विनोदी मालिका लेखन- हॅकस

उत्कष्ट अभिनेत्री विनोदी मालिका- जीन स्मार्ट  (हॅकस)

उत्कृष्ट अभिनेता विनोदी मालिका- जॅसन सुडेकिस ( टेड लासो)

उत्कृष्ट सहायक अभिनेता विनोदी मालिका- ब्रेट गोल्डस्टेन (टेड लासो)

उत्कृष्ट मर्यादित मालिका – दी क्वीन्स गॅम्बिट

उत्कृष्ट दिग्दर्शन मर्यादित  मालिका- आय मे डिस्ट्रॉय यू

उत्कृष्ट अभिनेत्री मर्यादित मालिका किंवा चित्रपट- केट विन्सलेट (मेर ऑफ इस्टओन)

उत्कृष्ट अभिनेता मर्यादित मालिका- इवान मॅकग्रेगॉर (हॉल्सटन)

उत्कृष्ट सहायक अभिनेत्री मर्यादित मालिका- ज्युलियनी निकोलसन (मेर ऑफ इस्टओन)

उत्कृष्ट सहायक अभिनेता  मर्यादित मालिका- इव्हान पीटर्स (मेर ऑफ इस्टओन)

उत्कृष्ट स्पर्धा कार्यक्रम- रूपॉलस ड्रॅग रेस

उत्कृष्ट भाषण मालिका- लास्ट विक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर

उत्कृष्ट लेखन विविध मालिका- लास्ट विक टुनाईट विथ जॉन ऑलिव्हर.

उत्कृष्ट व्यक्तिचित्र मालिका- सॅटर्डे नाइट लाइव्ह

उत्कृष्ट विशेष कार्यक्रम- स्टीफन कोलबर्ट इलेक्षन नाइट २०२०- डेमोक्रसीज लास्ट स्टँड बिल्डिंग बॅक अमेरिका ग्रेट अगेन बेटर २०२०उत्कृष्ट वैविध्यपूर्ण मालिका (पूर्व ध्वनिचित्रमुद्रित) – हॅमिल्टन.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix series the crown awards excellent drama series akp
First published on: 21-09-2021 at 01:16 IST