सोशल मीडियाचा मोठा वापर करणाऱ्यांसाठी, दिवसातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फेसबुकच्या अॅपवरच आता व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या फेसबुककडून चाचणी घेण्यात येत आहे. या बटणाच्या मदतीने फेसबुक वापरकर्त्यांना एका क्लिकवर व्हॉट्सअॅप सुरु करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील प्रसिद्ध संकेतस्थळ असलेल्या ‘द नेक्स्ट’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार, फेसबुक अॅपच्या मेन्यूमध्ये व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले जाणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. फेसबुकचे अँड्रॉईड अॅप वापरणाऱ्या काहींसाठी सध्या हे फिचर उपलब्ध आहे. सध्या हे बटण डॅनिश भाषेत आहे. मात्र फेसबुकने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

फेसबुकवर व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले गेल्यास त्याचा मोठा फायदा दोन्ही सुविधांचा वापर करणाऱ्यांना होईल. यामुळे फेसबुक अॅप बंद न करता फक्त एका क्लिकवर व्हॉट्सअॅपवर जाता येईल. याचा फायदा फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही सेवांना होणार आहे. या फिचरमुळे फेसबुक आपली सहयोगी कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते वाढवू शकते. याशिवाय केवळ व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनाही फेसबुककडे वळवण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो.

अमेरिकेसह इतर काही देशांमधील नागरिक केवळ फेसबुकचा वापर करतात. मात्र व्हॉट्सअॅपचा वापर करत नाहीत. या देशांमधील लोक व्हॉट्सअॅपऐवजी गुगलचे अॅप, स्नॅपचॅट, वीचॅट आणि स्काईपचा वापर करतात. या सर्वांनी व्हॉट्सअॅपचा वापर करावा, असे प्रयत्न कंपनीकडून सुरु आहेत. फेसबुकवर व्हॉट्सअॅपसाठी शॉर्टकट बटण दिले गेल्यास कंपनीला फायदा होईल. यामुळे व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्याही वाढेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New feature for facebook and whatsapp users facebook tests whatsapp shortcut in its app
First published on: 23-09-2017 at 13:09 IST