गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जन्मानंतर बाळांची करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. यासोबत ही जुळी बाळं करोनाची लागण झालेले सर्वात लहान वयाचे रुग्ण ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोलीपूर गावात राहणारी गरोदर महिला करोना पॉझिटिव्ह आढळली होती. महिला राहत असलेल्या ठिकाणी मुंबईतून परतलेल्या काही जणांना करोनाची लागण झाली होती. १६ मे रोजी महिलेने वाडनगर सिव्हील रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला. यामधील एक मुलगा तर दुसरी मुलगी असल्याी माहिती जिल्हा विकास अधिकारी मनोज दक्षिणी यांनी दिली आहे.

“नवजात बाळांना आणि त्यातही जुळ्यांना करोनाची लागण झाल्याची ही पहिलीच केस आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे. नवजात मुलाचा रिपोर्ट १८ मे रोजीच आला होता. तर मुलीचा रिपोर्ट शुक्रवारी आमच्याकडे आला असं मनोज दक्षिणी यांनी सांगितलं आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newborn twins tests corona positive in gujarat sgy
First published on: 22-05-2020 at 19:09 IST