नवी दिल्ली : ‘न्यू इंडिया फाउंडेशन’ने शनिवारी ‘एनआयएफ कमलादेवी चट्टोपाध्याय’ पुस्तक पुरस्कारांची घोषणा केली. १० पुस्तकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि एम. विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर, कार्यांवर आणि तत्त्वज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे.
२०१८मध्ये सुरू करण्यात आलेला हा पुस्तक पुरस्कार स्वातंत्र्यानंतर भारतीय इतिहासाच्या कोणत्याही पैलूवर काम करणाऱ्या कोणत्याही देशाचा नागरिक असलेल्या लेखकाला दिला जातो. मूळ इंग्रजी भाषेत असलेले पुस्तक किंवा इंग्रजीत अनुवादित केलेले पुस्तक यांना पुरस्कार दिला जातो. विजेत्या लेखकाला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.
गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या १० पुस्तकांची यादी पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली. अग्रणी नेते, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वे, राजकीय चळवळी, सामाजिक बदल आणि भारताच्या मार्गाला आकार देणाऱ्या समुदायांची चरित्रे यांचा यात समावेश आहे.
या पुस्तकांना पुरस्कार जानकी बखले यांचे ‘सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व’
बेला भाटिया यांचे ‘इंडियाज फॉरगॉटन कंट्री : अ व्ह्यू फ्रॉम द मार्जिन’
उर्मिला देशपांडे आणि थियागो पिंटो बारबोसा यांचे ‘इरु : द रिमार्केबल लाइफ ऑफ इरावती कर्वे’
अविनाश पालीवाल यांचे ‘इंडियाज निअर ईस्ट : अ न्यू हिस्ट्री’
मनु पिल्लई यांचे ‘गॉड्स, गन्स अँड मिशनरीज : द मेकिंग ऑफ द मॉडर्न हिंदू आयडेंटिटी’
आणि अपराजित रामनाथ यांचे ‘इंजिनीयरिंग अ नेशन : द लाइफ अँड करिअर ऑफ एम. विश्वेश्वरय्या’