scorecardresearch

Premium

निपा विषाणूबाधित मृतांचे अंत्यसंस्कार करण्यातही डॉक्टरांची मदत

अंत्यसंस्कारापर्यंतची कामे डॉक्टरांनी त्यांच्या कर्तव्यापलीकडे जाऊन केली आहेत.

निपा विषाणूबाधित मृतांचे अंत्यसंस्कार करण्यातही डॉक्टरांची मदत

केरळातील कोझीकोड जिल्ह्य़ात निपा विषाणूचा प्रसार झाल्यानंतर किमान सतरा जण मरण पावले असून यात अनेक मृतांना खांदा देण्यापासून अंत्यसंस्कारापर्यंतची कामे डॉक्टरांनी त्यांच्या कर्तव्यापलीकडे जाऊन केली आहेत.  या मृतांचे नातेवाईक मृतदेहापासून दूर राहत असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. कोझीकोड महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. आर.एस.गोपाकुमार यांनी एकूण १२ मृतदेह हाताळले. त्यांच्या अंत्यसंस्कारापर्यंतची अनेक कामे त्यांनी केली. एकूण तीन रूग्णांना मृत्यूनंतर खांदा दिला व त्यांचे अंत्यसंस्कार केले असे त्यांनी सांगितले. निपा विषाणूने एकूण १७ जण मरण पावले, त्यातील १४ कोझीकोडचे असून तीन शेजारच्या मल्लापूरमचे आहेत. काल राज्य सरकारने मृतांची संख्या १७ असल्याचे जाहीर केले, त्यात महंमद साबीथ या पहिल्या रूग्णाचा समावेश आहे, त्याच्या नमुन्यांची निपा चाचणी करण्यात आली नव्हती. गोपाकुमार यांनी सांगितले, की निपाने मरण पावलेल्या सतरा वर्षांच्या मुलाचे अंत्यसंस्कार त्यांनी केले आहेत. कारण त्याची आई वेगळ्या कक्षात होती, तिलाही संसर्ग झाल्याचा संशय होता. ती तिच्या मुलाला शेवटचे बघू शकली नाही व तिने गोपाकुमार यांना मुलावर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार दिले. त्या मुलाच्या शेवटच्या प्रवासात त्याचे आप्तेष्ट बरोबर नव्ह्ते, त्यामुळे अंत्यसंस्कार करताना मलाच वाईट वाटले. त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले, मी ते माझे कर्तव्यच मानले. ५३ वर्षांची एक व्यक्ती निपाने मरण पावली , पण त्याच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळ त्याचेही अंत्यसंस्कार गोपाकुमार यांनीच केले. १९ वर्षांच्या विवाहितेच्या पतीवरही त्यांनीच अंत्यसंस्कार केले. या महिलेने विष खाल्ले होते व क र्नाटकात तिच्या बेडशेजारी निपा रूग्णांवर उपचार करण्यात आले होते. पण नंतर या महिलेच्या नमुन्यात काही निघाले नाही. निपाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून उत्सर्जित झालेल्या कुठल्याही द्रवापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. गोपाकुमार यांनी मूसा यांच्या अंत्यविधीतही भूमिका पार पाडली, त्यांचे दोन मुलगे व पत्नीही निपा विषाणूने मरण पावली. साबिथच्या मृतदेहाला अंघोळ घालताना मुसा व त्याच्या मुलाला विषाणूची लागण झाली असावी. दहा फु टांचा खड्डा खणून ५ किलो ब्लिचिंग पावडर त्यात टाकून नंतर डबल प्लास्टिक पिशवीत गुंडाळून तो मृतदेह पुरण्यात आला, त्या वेळी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेच्या डॉ. रेश्मा सहाय उपस्थित होत्या. यात इबोलाचे सोपस्कार पार पाडण्यात आल्याचे डॉ.गोपाकुमार यांनी सांगितले. काही वेळा कोझीकोड येथील स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. त्या वेळी मृतदेह काही तास रूग्णवाहिकेत होता. नंतर भारथा पुझा किनारी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. गोपाकुमार यांनी केलेल्या कामाची केरळ विधानसभेत आरोग्य मंत्री के.के.शैलजा यांनी प्रशंसा केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nipah virus

First published on: 07-06-2018 at 01:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×