‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ईर्ष्या करणारी खेडूत महिला आहेत’, या शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी मंत्री गिरिराज सिंह यांनी. मोदी आणि नितीश कुमार या दोघांच्या पक्ष नेत्यांकडून एकमेकांवर सध्या चिखल फेकीच्या राजकारणाने जोर धरला आहे.
नितीश कुमार हे खेडवळ महिलेसारखे मोदींवर जळतात आणि मत्सराच्या भावनेमुळे ते मोदींशी वाद घालतात, असे बीजेपी नेता गिरिराज म्हणाले. मोदी पाटणा दौ-यावर गेल्यावर पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना गिरीराज यांनी निरीश कुमारांवर टोला लावला. ज्याप्रमाणे ते मोदींवर जळत आहेत, हे बघता ते मुख्यमंत्री असल्याचे वाटत नाही. त्यांची संकुचितता यातून दिसून येते. नरेंद्र मोदींवर टिका करून बिहारमधील जनतेच्या ऐक्याला तडा जाईल असा प्रयत्न नितीश कुमार करत आहेत, अशी टिकाही सिंह यांनी केली. मात्र नितीशकुमार यांचा हा डाव भाजप हाणून पाडेल, असेही त्यांनी सांगितले.
मोदी जेव्हा बिहारमध्ये पोहोचले तेव्हा प्रोटोकॉल पाळले गेले नाहीत. अतिथीगृहात मोदी पोहोचले तेव्हा डीएम तेथे गेले नाहीत आणि विमानतळावर देखील फक्त एक पोलीस उपायुक्त उपस्थित होते, असेही ते म्हणाले.