बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राज्याच्या आर्थिक मुद्दय़ांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री विजेंद्रप्रसाद यादव यांनी ही घोषणा केली.
या दोन्ही नेत्यांचे व्यक्तिगत संबंध सौहार्दाचे नसले तरी राज्याचा प्रमुख म्हणून नितीशकुमार ही भेट घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही नेते मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा भेटल्याचा दाखला त्यांनी दिला. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नितीशकुमार यांनीही अनेक वेळा बिहार आर्थिक संकटातून जात असल्याने याबाबतच्या मुद्दय़ांवर पंतप्रधानांना भेटू असे स्पष्ट केले आहे.
मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यावर जनता दलाने २१ महिन्यांपूर्वीच भाजपशी असलेली युती तोडली होती.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2015 रोजी प्रकाशित
बिहारच्या आर्थिक मुद्दय़ांवरून नितीशकुमार मोदींना भेटणार
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राज्याच्या आर्थिक मुद्दय़ांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

First published on: 20-03-2015 at 12:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar to meet pm narendra modi on financial issues of bihar