सुटीच्या दिवशी वा कार्यालयीन वेळेनंतर कामासंबंधीचे कॉल आणि ईमेलला नकार देणे सहज शक्य होणार आहे. यासंबंधीचे एक खाजगी विधेयक राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मांडले आहे. जर हे विधेयक पास झाले तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बॉसच्या कॉल आणि मेलपासून दिलासा मिळणार आहे. या विधेयकाचे नाव ‘राईट टू डिसकनेक्ट’ असे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामाच्या कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त कार्यालयातून येणाऱ्या कामासंबंधीच्या कॉल आणि इमेलपासून दूर राहण्याचा अधिकार द्यावा. तसेच सुटीच्या दिवशी व कामाच्या वेळेशिवाय बॉस आणि कार्यालयातून येणारे कामासंबंधी कॉल आणि ईमेल रिजेक्ट करण्याचाही अधिकार देणारी कामगार कल्याण प्राधिकरण स्थापना करावे, असे खाजगी विधेयक सुळे यांनी संसदेमध्ये मांडले आहे. संसदीय कार्यप्रणालीत मंत्रिमंडळात नसलेल्या खासदारालाही विधेयक मांडता येते.त्याला खासगी विधेयक म्हटले जाते. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी २८ डिसेंबर रोजी हे विधेयक मांडले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No calls and emails from boss after working hours proposes a private members bill in parliament
First published on: 30-12-2018 at 12:45 IST