संता आणि बंतावरून केल्याजाणाऱया विनोदांवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, या विनोदांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संता-बंताच्या विनोदांमुळे जगभरात शीख समाजाची प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे अशा विनोदांवर आणि असे विनोद पसरविणाऱया संकेतस्थळांवर बंदी घालण्यात यावी, या आशयाची याचिका हरविंदर चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. पुढील महिन्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संता आणि बंता या दोन व्यक्तीरेखांच्या माध्यमातून आजवर असंख्य विनोद गाजले आहेत. सोशल मीडियावरून देखील संता-बंताचे विनोद मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात.