पक्षात कोणीही नाराज नाहीत- सुषमा स्वराज

अडवाणी नाराज नसून, मोदींच्या निवडीला पक्षात कोणाचाही विरोध नसल्याचे, भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी आज (शनिवार) सांगितले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी पंतप्रधानपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. पण, अडवाणी नाराज नसून, मोदींच्या निवडीला पक्षात कोणाचाही विरोध नसल्याचे, भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी आज (शनिवार) सांगितले आहे. सुषमा स्वराज, अनंत कुमार, बलबीर पुंज यांनी आज सकाळी अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली.
अडवाणींचा विरोध असताना भाजपने काल (शुक्रवारी) मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले. यावर अडवाणी यांनी पक्षाध्‍यक्ष राजनाथ सिंह यांना लिहिलेल्‍या पत्रात त्‍याच्‍या कार्यपद्धतीवर नाराजी व्‍यक्‍त केली होती. काल झालेल्‍या पक्षाच्‍या संसदीय बैठकीसही ते अनुपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nobody is against to modi selection sushma swaraj