Noida Nikki Bhati death case : गेल्या काही दिवसांपासून ग्रेटर नोएडा येथे निक्की भाटी या विवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील विपिन हा मुख्य आरोपी असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणात आता एक वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. सोमवारी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये २१ ऑगस्टच्या संध्याकाळी, निक्कीवर हल्ला झाला त्या वेळी, विपिन हा ग्रेटर नोएडातील त्याच्या घराबाहेरील एका किराणा दुकानात उभा असल्याचे आढळून आले आहे.
भाटी यांच्या सिरसा गावातील भाटी याच्या घराच्या विरूद्ध बाजूला असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा घटनाक्रम पुन्हा तपासण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच निक्कीच्या कुटुंबीयांनी शेअर केलेले व्हिडीओ देखील तपासले जात आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये निक्की ही पेटलेल्या अवस्थेत जिन्यावरून खाली उतरताना दिसत आहे. हे व्हिडीओ निक्कीची बहीण कांचनने काढले होते. कांचनचे लग्न विपिनचा धाकटा भाऊ रोहित याच्याशी झाले असून ती देखील याच घरात राहते.
दरम्यान विपिनचे वडील सतवीर आणि भाऊ रोहित हे कथित हत्येच्या घटनेपासून फरार होते, सोमवारी पोलिसांनी या दोघांना या प्रकरणात अटक केली आहे. विपिन आणि त्याची आई दया यांना रविवारी अटक करण्यात आली आहे. विपिन कथितपणे पोलिसांपासून पळत असताना त्याच्या पायावर गोळी घालून त्याला पकडण्यात आले.
निक्कीवर कथितपणे झालेल्या हल्ल्याच्या वेळी विपिन हा त्याच्या सहा वर्षांच्या मुलासह रस्त्यावर उभा असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधील टाइम स्टॅम्पवरून दिसून येत आहे. तो एका किराणा दुकाणात असल्याचे फुटेज घटना घडली तेव्हाचे म्हणजेच संध्याकाळी ५.४५ वाजताचे असल्याचे समोर आले आहे. निक्कीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि कांचनने काढलेल्या निक्की जळत असतानाच्या व्हिडीओवर रेकॉर्ड झालेली वेळ देखील हीच आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये विपिन असल्याचा दावा केला जाणारी व्यक्ती घराच्या बाहेर संध्याकाळी ५.४२ वाजता चेक शर्ट आणि निळी पँट घालून एका पांढऱ्या रंगाच्या कारच्या जवळ थांबल्याचे दिसत आहे. त्यावेळी एक मुलागा त्याच्याकडे येतो. त्यानंतर तो व्यक्ती तिथेच घुटमळताना आणि रोडकडे खाली पाहताना आणि लेनमधील इतर दोन-तीन मुलांशी बोलताना दिसत आहे. सायंकाळी ५.४७ वाजता अचानक गोंधळ उडाल्याचे फुटेजमध्ये पाहायला मिळात आहे. त्यानंतर चेक शर्ट घातलेला एक व्यक्ती घराच्या दिशेने धावताना दिसतो, त्याच्या मागोमाग वृद्ध व्यक्तीही घाईने घरात जातो.
विपिन याचा चुलत भाऊ देवेंद्र याने हा गोंधळ उडाला त्यावेळी नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली आहे. त्याने दावा केला की निक्की किचनमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याने भाजली. “मी विपिन निक्कीला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याबद्दल ओरडताना ऐकले. सर्वजण निक्कीला आगीमुळे दुखापत झाल्याबद्दल ओरडत होते. जर तुम्ही फुटेज पाहिले, तर तुम्हाला विपिनच्या पाठोपाठ मी माझ्या दुकानातून शॉर्टमध्ये बाहेर येताना दिसेल. मी दुकानाचे शटर खाली खेचले आणि कार काढून काका-काकूंना बरोबर घेऊन मी निक्कीला रुग्णालयात घेऊन गेलो. तिने घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याचे आम्हाला सांगितले आणि तिला श्वास घेता येत नसल्याने रुग्णालयाकडे जात असताना वाटेत सतत पाणी मागत राहिली. आम्ही तिला fortis रुग्णालयात घेऊन गेलो, जेथे तिने डॉक्टरांना देखील सिलिंडरच्या स्फोटाबद्दल सांगितले.”
पोलीस काय म्हणाले?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की फुटेजचे आणि निक्कीच्या कुटुंबाने शेअर केलेला व्हिडीओचे टायमिंग जुळवून पाहिले पाहिजे. “आम्ही काही गोष्टी क्रॉस चेक करू, विशेषतः वेळेच्याबाबतीत. आम्ही असेही फुटेजमधील कंटेंट आणि कांचनने दिलेला मुख्य पुरावा असलेला व्हिडीओ पडताळत आहोत. सुरूवातीला निक्कीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील फुटेज देखील तपासण्याची गरज आहे,” असे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
दरम्यान देवेंद्रने सांगितलेली माहिती आणि बहिणीला पेटवून देण्यात आल्याच्या कांचनने दाव्यामध्ये विसंगती आढळून येत आहे. कांचनने तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओ, याच्या आधारावरच निक्कीच्या कुटुंबाने विपिन आणि त्याच्या कुटुंबावर हत्येचे आरोप केले आहेत. या पाच सेकंदांच्या व्हिडीओत विपिन हा निक्कीला केसांना धरून ओढत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या लहान व्हिडीओमध्ये निक्की पेटलेल्या अवस्थेत दिसत आहे. तिसऱ्या मोठ्या व्हिडीओमध्ये निक्की जमिनीवर बसल्याचे दिसत आहे, तिचे कपडे जळाल्याचे दिसत आहेत.
“माझ्या सासून रॉकेलची बाटली विपिनकडे दिली आणि त्याने ती निक्कीवर उलटली. मी विरोध केल्यानंतर मला देखील मारहाण केली. माझा नवरा आणि सासरा तेथे उपस्थित होते, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही. तिला पेटवून दिल्यानंतर, शेजाऱ्यांच्या मदतीने मी माझ्या बहिणीला घेऊन ग्रेटर नोएडा येथील Fortis रुग्णालयात गेले. तेथून दिला सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले, पण ती वाचू शकली नाही,” असा आरोप कांचनने केला आहे.
तर विपिनच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, मारहाणीचा व्हिडीओ जो काचनने पोस्ट केला आहे तो गेल्या हिवाळ्यातील आहे, २१ ऑगस्टचा नाही. पोलिसांनी ते सर्व शक्यतांचा तपास करतील असे म्हटले आहे.
पोलिसांनी गोळी घातल्यानंतर रुग्णालयात विपिनला रुग्णालयात नेण्यात आले, येथे रविवारी रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडीओमध्ये विपिन हा निक्कीची हत्या केल्याचा आरोप फेटाळताना दिसत आहे.
“