ई-तिकीट नोंदणीची वाढती मागणी लक्षात घेता आयआरसीटीसी(भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन)ने यावर्षी आपल्या इंटरनेट तिकीट बुकींग (ई-तिकीट) क्षमतेत वाढ करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाची तिकीट नोंदणीची क्षमता एका मिनिटाला ७,२०० तिकीटे इतकी होईल. रेल्वेच्या समिक्षा बैठकीत संकेतस्थळावरील टिकीट नोंदणी क्षमता वाढणार असल्याची माहीती आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक आर.के.टंडन यांनी रेल्वे मंत्री सी.पी.जोशी यांनी दिली आहे. तसेच या प्रक्रियेला एकूण १०० कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचेही आर.के.टंडन यांनी सांगितले. सध्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाची तिकीट नोंदणी क्षमता २,००० तिकीटे प्रतिमिनिट इतकी आहे.

Story img Loader