भारतीय वंशाच्या एनआरआय जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रतीक आणि त्याची पत्नी या दोघांचा हा व्हिडीओ आहे. गुजरातमध्ये हे दोघंही नवरात्रात आले होते. या दोघांनी गरबा खेळण्याआधी किस केलं आणि त्याच मैदानात अश्लील कृतीही केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या जोडप्यावर चांगलीच टीका झाली. ज्यानंतर त्यांनी देश सोडून ऑस्ट्रेलिया गाठली आहे. या दोघांनाही त्यांच्या कृतीबाबत प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
प्रतीक आणि त्याची पत्नी असे दोघंही जण नवरात्रात ऑस्ट्रेलियाहून गुजरातला आले होते. गुजरातच्या बडोदा या ठिकाणी एका मैदानात हे दोघं गरबा खेळण्यासाठी गेले होते. अचानक दोघं बेभान झाले, दोघांनी मैदानातच एकमेकांचं चुंबन घेतलं आणि त्यानंतर प्रतीकने पत्नीला उचलून घेत अश्लील कृती करत पुन्हा चुंबन घेतलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर या दोघांविरोधाक गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर या दोघांनीही सोशल मीडियावर आणि लेखी माफी मागत पुन्हा ऑस्ट्रेलिया गाठली आहे. या दोघांना नवरात्रात अशी कृती केल्याने प्रचंड ट्रोल करण्यात आलं. Newsbytes ने हे वृत्त दिलं आहे. या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.
सोशल मीडियावर जोडप्यावर जबरदस्त टीका आणि ट्रोलिंग
सोशल मीडियावर प्रतीक आणि त्याच्या पत्नीचा चुंबन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या दोघांवर टीका होऊ लागली. सनातन संत समितीने या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली. वकील भाविन व्यास यांनी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी या प्रकरणात दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत पोलिसांत धाव घेतली.
प्रतीक आणि त्याच्या पत्नीने मागितली लेखी माफी
प्रतीक आणि त्याच्या पत्नीच्या चुंबनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांना समन्स बजावण्यात आलं. त्यानंतर या दोघांनी पोलीस ठाण्यात येत लेखी माफी मागितली. आम्ही नवरात्रीच्या पवित्र ठिकाणी गैरवर्तन केलं त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आम्हाला माफ करण्यात यावं असं जोडप्याने लिहून देत माफी मागितली. या दोघांचं लग्न १६ वर्षांपूर्वी झालं आहे या दोघांना दोन मुलंही आहेत. मागील काही वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात राहात आहेत. शिवाय हे दोघंही अनिवासी भारतीय आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर आणि लेखी माफीनंतर या दोघांनीही ऑस्ट्रेलिया गाठली आहे.