NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आता अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. सीबीआयनं आज सकाळपासून देशभरात या प्रकरणाशी संबंधित १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संडय पांडे यांना देखील नोटीस बाजवण्यात आली होती. यासंदर्भात ईडीनं देखील त्यांची चौकशी केली असून त्यासंदर्भात संजय पांडे यांच्याव्यतिरिक्त एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे NSE घोटाळा?

आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. ही सॅाफ्टवेअरशी संबंधित कंपनी २००१ मध्ये पांडे यांनी ते सेवेत नसताना स्थापन केली. सेवेत रुजू झाल्यावर पांडे यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा २००६मध्ये राजीनामा दिला. या कंपनीत पांडे यांचे कुटुंबीय संचालक आहेत. झावबा कॉर्पवर उपलब्ध माहितीवरून संतोष पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत. या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती. सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातच संजय पांडेंची सध्या चौकशी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय पांडेंविरोधात फोन टॅपिंग प्रकरणात FIR!

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.