Nude Video in Teacher’s Phone : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतून निलंबित करण्यात आलेल्या कला शिक्षकाकडून विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आले आहेत. पोलिसांनी संबंधित शिक्षकाच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. न्यूज कर्नाटकच्या वृत्तानुसार फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कर्नाटकातील मोरारजी देसाई निवासी शाळेत हा प्रकार घडला आहे. मुनियप्पा असं या शिक्षकाचं नाव असून त्याच्या मोबाईलमध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक नग्न व्हिडिओ सापडले आहेत. मुनियप्पा सध्या त्या शाळेत कार्यरत नाहीत. त्यांना डिसेंबर २०२३ मध्ये निलंबित करण्यात आले होते. तर, जून २०२४ मध्ये दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली.

मुनियप्पा यांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थिंनींचे व्हिडिओ असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली होती. त्यांनी काही महिन्यांपूर्वी मुनियप्पा विद्यार्थ्यांचे मोबाइल फोनद्वारे चित्रीकरण करत असल्याची तक्रारही केली होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, मुनियप्पा सध्या शाळेत नोकरीला नाही आणि त्यामुळे यापुढे कोणताही धोका नाही.

हेही वाचा >> Who is Marie Alvarado-Gil: ‘नोकरी टिकवायची असेल तर लैंगिक सुख दे’, महिला सेनेटरची पुरुष कर्मचाऱ्याकडे मागणी, खटला दाखल

शिक्षकाच्या मोबाईलमधील व्हिडिओ कसे सापडले?

पालकांच्या तक्रारीनुसार शिक्षकाचा फोन फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर डेटा रिकव्हर करून मुनियप्पाच्या फोनमध्ये पाच हजारांहून अधिक न्यूड व्हिडिओ असल्याचे उघड झाले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना शाळेतील सांडपाण्याची टाकी स्वच्छ करण्यास भाग पाडले

२०२३ मध्ये, समाजकल्याण मंत्री एचसी महादेवप्पा यांनी विभागाचे प्रधान सचिव पी मणिवन्नन यांना मोरारजी देसाई निवासी शाळेतील वॉर्डन, मुख्याध्यापक आणि गट-डी कर्मचारी सदस्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. कारण त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील सांडपाण्याची टाकी स्वच्छ केली. या घटनेत पाच ते सहा विद्यार्थ्यांचा समावेश होता, जे इयत्ता सातवी ते नववीचे होते आणि ते सर्व अनुसूचित जातीतील असल्याचं सांगितलं जातं.