प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ आणि खासदार मिमी चक्रवर्ती यांचा टिकटॉक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ खूप जुना होता पण लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अचानकपणे तो ट्रेण्डमध्ये आला. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोलसुद्धा केलं होतं. त्या ट्रोलिंगवर नुसरत आणि मिमी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात नुसरत आणि मिमी यांनी हजेरी लावली होती. यावेळी टिकटॉकच्या व्हिडीओबद्दल नुसरत म्हणाल्या, ‘खूश होणं काही वाईट गोष्ट आहे का? तरुणाईलाही टिकटॉकचं वेड आहे आणि बरेच दिवस पोस्ट नाही केलं तर हे चाहतेच टिकटॉक व्हिडीओची मागणी करतात.’

आणखी वाचा : ‘तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती’; पतीने विचारलेल्या प्रश्नावर नुसरत जहाँ अवाक्

नुसरत आणि मिमी संसदेबाहेर काढलेल्या एका फोटोमुळेही ट्रोल झाल्या होत्या. त्या फोटोबद्दल मिमी म्हणाल्या, ‘संसदेतला आमचा पहिलाच दिवस होता आणि खासदारकीचं ओळखपत्र मिळालं होतं. आमच्यासाठी फार अभिमानाची बाब होती म्हणून फोटो काढून पोस्ट केला. मी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असल्याने फोटो पोस्ट करण्यापूर्वी मॅनेजरला विचारलंसुद्धा होतं की हा फोटो ट्रोल होईल का? ते म्हणाले की तुम्ही नेहमीच नकारात्मक विचार का करता? नेमका तोच फोटो ट्रोल झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जीन्स आणि शर्ट परिधान करून संसदेत जाऊ शकत नाही असा कुठेच लिखित नियम नाही. याच पोशाखात जर पुरुषाने फोटो पोस्ट केला असता तर कोणीच प्रश्न उपस्थित केला नसता.’ मी लहानपणापासूनच बिनधास्त स्वभावाची असल्याचं मिमी यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरीचा पहिला दिवस असेल तर आनंदात अनेकजण सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात. तेच आम्ही केलं तर गैर काय, असाही सवाल नुसरत यांनी उपस्थित केला.