officials ate 14 kg dry fruits in one hour : मध्यप्रदेशमधील शाहडोल जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी आयोजित एका सरकारी कार्यक्रमात पंचायत अधिकाऱ्यांनी अवघ्या एका तासात १४ किलोग्रॅम सुकामेवा, पाच किलो साखर घातलेला चहा आणि ६ लिटर दुध फस्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. गंगाजल संवर्धन अभियानानाअंतर्गत २५ मे रोजी भडवाहीग्राम पंचायत येथे झालेल्या कार्यक्रमाचा हा एक भाग होता.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ग्रामस्थांना साठी खिचडी देण्यात आली, तर जिल्हाधिकार केदार सिंग, जिल्हा पंचायतचे सीईओ नरेंद्र सिंग आणि एसडीएम प्रगती वर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना करदात्यांच्या पैशाने प्रिमियम स्नॅक्स देण्यात आले.

अवघ्या ६० मिनिटांत संपलेल्या या बैठकीचे एकूण बिल हे  १९,०१० रुपये इतके झाले. या कार्यक्रमाचे बिल गुरूवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अखेर हे बिल व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाई करणे भाग पडले आहे.

थोड्या कालावधीसाठीच कार्यक्रमात सहभागी झालेले जिल्हाधिकारी केदार सिंह यांनी फ्री प्रेसशी बोलताना सांगितले की त्यांना या प्रकाराबद्दल माहिती नव्हती आणि त्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच एसडीएम आणि इतर अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण विभागातील घोटाळाही चर्चेत

शिक्षण विभागातील घोटाळा उघडकीस आल्यापासून काही दिवसांपासून शहडोल जिल्हा हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यात, ४,७०४ रुपये किमतीचा २४ लिटर पेंट दोन सरकारी शाळांना देण्यासाठी ४४३ कामगार आणि २१५ गंवडी नियुक्त केल्याचा प्रकार समोर आला होता, आणि या कामासाठी ३.३८ लाखांचे बिल मंजूर करण्यात आले होते. हा घोटाळा बेओहारी येथे झाला होता आणि वाढवून दाखवलेल्या खर्चाचे बिल ऑनलाईन लीक झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता.