चुकीचा ओटीपी सांगितल्यानं ओला चालकाने ओला चालकाने एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या केल्याचा धक्कादाय प्रकार चेन्नईत उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. उम्रेंद्र असं या हत्या झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव आहे.

उम्रेंद्र हे कोईम्बतूर येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. चेन्नईत ते आपल्या पत्नी आणि मुलांसह नातेवाईकाकडे आले होते. रविवारी रात्री ते आपल्या पत्नी आणि मुलांसह चित्रपट बघायसाठी एका मॉलमध्ये गेले होते. तेथून परतताना त्यांच्या पत्नीने ओला कॅब बुक केली. मात्र, चुकीचा ओटीपी तेही उशीरा सांगितल्याने ओला ड्रायव्हर आणि उम्रेंद्र यांच्यात वाद झाला.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद विकोपाला गेल्यानंतर ओला ड्रायव्हरने उम्रेंद्र यांना गाडीतून उतरवण्यास सांगितले. तसेच त्यांच्या दिशेने फोन फेकला. या रागात उम्रेंद्र यांनी गाडीतून उतरत दरवाज जोरदार ढकलला. त्यानंतर दोघांमध्येही हाणामारी सुरू झाली. यात जब्बर मारहाण झाल्याने उम्रेंद्र बेहोश झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि इतरांनी त्यांना रुग्णायलात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, ओला ड्रायव्हर रवी यांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.