न्यूयॉर्क विमातळावरील रखडपट्टीनंतर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्यानंतर आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अमेरिकन विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेमुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. ओमर अब्दुल्ला यांना न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात उपस्थित राहायचे होते. मात्र, न्यूयॉर्क विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सेकंडरी इमिग्रेशन चेकचे कारण देत अब्दुल्ला यांना तब्बल दोन तास विमानतळावर अडवून धरण्यात आले. या प्रकारानंतर ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. अमेरिकन विमानतळावर होणाऱ्या वारंवार तपासण्या डोकेदुखी ठरू लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. वेळ घालविण्यासाठी मला विमानतळावर शाहरूख खानसारखे पोकेमॉनही पकडता आले नाही, अशी मिष्किल टिप्पणीही ओमर अब्दुल्ला यांनी केली.
डोक्यावरची पगडी उतरवायला सांगितल्याने भाजप खासदाराने अमेरिकेचा व्हिसा नाकारला!
काही महिन्यांपूर्वी लॉस एंजलिस विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून शाहरूख खान याची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. या सर्व प्रकाराबद्दल स्वत: शाहरूख खान याने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. सध्या जगातील परिस्थिती पाहता असलेली सुरक्षाव्यवस्थेची गरज मी समजू शकतो, मी त्याचा आदरही करतो. मात्र, अमेरिकच्या इमिग्रेशन विभागाकडून प्रत्येकवेळी ताब्यात घेतले जाणे हे खूपच उद्वेगजनक असल्याची प्रतिक्रिया शाहरूख खान याने म्हटले होते. दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या दुतावासात सुरक्षेचे कारण पुढे करत डोक्यावरील पगडी उतरविण्याची सक्ती केल्यामुळे भाजपच्या खासदाराने व्हिसा नाकारल्याचा प्रकार उजेडात आला होता. शेतीच्या विषयावर माहिती देण्यासाठी मला अमेरिकेकडून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अमेरिकन दुतावासामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत वेगळाच प्रकार घडला. दुतावासात प्रवेश करताना सिंग यांना डोक्यावरील पगडी उतरविण्यास सांगण्यात आले. मात्र, ही पगडी म्हणजे आमची पारंपरिक शान असल्याचे सांगत विरेंद्र सिंग यांनी पगडी उतरविण्यास नकार दिला आणि तेथून निघून आले होते.