करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना स्वामीनाथन यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि मास्क वापरण्यासाठी आवाहन केले आहे. मास्क “तुमच्या खिशातील लस” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वामीनाथन म्हणाल्या, “ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरणाची गरज आहे. सर्व वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतेही बारीत लक्षणे दिसली तर बारकाईने निरीक्षण करणे, गरजेचे आहे. तसेच ‘ओमिक्रॉन’ बाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omicron is a serious warning to india who chief scientist soumya swaminathan srk
First published on: 28-11-2021 at 09:52 IST