करोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता ५७ राष्ट्रांमध्ये पसरला आहे. त्याचा प्रसाराबरोबरच आता ओमायक्रॉन बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक महामारीविषयक अहवालात म्हटलं आहे की, या विषाणूच्या संसर्गाची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक तपशीलाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे लसीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती या विषाणूप्रकाराच्या म्यूटेशन्समुळे कमी होत नाही ना, याविषयीचा अभ्यास करण्यासाठीही थोडा वेळ लागेल.
या अहवालात म्हटलं आहे की, जरी या विषाणूसंसर्गाची तीव्रता डेल्टा इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक असली, तरीही अधिक लोकांना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढेल. त्यामुळे रुग्ण आढळणे आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढण्यामध्ये काही काळ जावा लागेल. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या या करोना प्रकाराचं जागतिक आरोग्य संघटनेने २६ नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉन असं नामकरण केलं. या विषाणूप्रकार चिंताजनक समजला जात आहे.