On Camera Journalist steps on missing girls body while covering her disappearance video : जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या अनेक चित्रविचित्र घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असातात. आता ब्राझीलमधील बाकाबल येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. एका १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याचे रिपोर्टिंग करत असलेल्या वार्ताहराने त्या मुलीच्या मृतदेहावर पाय दिल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय झालं?

लेनिल्डो फ्रान्झो असे या पत्रकाराचे नाव असून तो मियरिम नदीच्या परिसरात रिपोर्टिंग करत होता. हरवलेल्या मुलीचे शेवटचे माहिती असलेले लोकेशन हेच होते. हा पत्रकार पाण्याचा प्रवाह आणि त्याची खोली याबद्दल माहिती देण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरला. जेव्हा तो छातीपर्यंतच्या पाण्यात गेला तेव्हा तो एका जागी अचानक अडखळला आणि त्याने त्याच्या सहकाऱ्यांना त्याला पाण्याच्या खाली काहीतरी पायाला लागल्याचे सांगितले.

“मला वाटतं की येथे खाली पाण्याच्या तळाला काहीतर आहे,” असे तो कॅमेरा सुरू असताना म्हणताना दिसत आहे. हा रिपोर्टर या घटनेने चांगलाच हादरून गेल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. “मी परत जाणार नाही, मला भीती वाटतेय. मला हातासारखं काहीतरी जाणवलं- ती इथे असू शकते. का? पण तो मासाही असू शकतो. मला माहिती नाही,” असं हा रिपोर्टर त्याच्या सहकाऱ्यांना सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे.

रिपोर्टिंगचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बचाव पथके आणि डायव्हर्सनी त्यांची शोध मोहिमं ३० जून रोजी सकाळी पुन्हा सुरू केली आणि हे रिपोर्टिंग ज्या ठिकाणी करण्यात आले होते त्याच ठिकाणी हरवलेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण रिपोर्टिंगच्या वेळी तो व्यक्ती मृतदेहाच्या थेट संपर्कात आला होता का याबद्दल स्पष्टता मिळू शकलेली नाही. दरम्यान मीडिआ रिपोर्ट्सनुसार. मृतदेह सापडलेल्या मुलीचे नावा हे Raíssa असे होते, आणि ती तिच्या मित्राबरोबर पोहायला गेली असता बुडाली होती. अपघाताने बुडाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, तसेच तिच्या शरीरावर इतर कुठल्याही बाह्य जखमा नव्हत्या असेही त्यांनी सांगितले.