फेसबूकवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ची तुलना दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधील जरवल खंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर सोमवारी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जरवल खंड येथील रशीद अहमद याने आरएसएसची तुलना दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदसोबत केल्यानंतर स्थानिक आरएसएस नेता अजय कुमार वर्मा यांनी नाराजी व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. अजय कुमार वर्मा यांनी फेसबूकवर करण्यात आलेल्या या तुलनेला आरएसएसचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

अजय कुमार वर्मा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी जखल येथील चौकात आरोपीला बेड्या ठोकल्या. कलम २९५ ए आणि ५०५ नुसार आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नवीन कुमार मिश्रा यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person arrested for comparing rss with jaish e mohammad
First published on: 19-02-2019 at 23:35 IST