ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” असे ओवेसी यांनी म्हटले. विशेष म्हणजे त्यांनी ट्विटरवर हे म्हणत असल्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

यानंतर आपला मोर्चा अमित शाह यांच्याकडे वळवताना ओवेसी म्हणाले, आता अमित शाहांना उत्तर द्यायचे आहे. आम्ही कोणाचं कर्ज बाकी ठेवत नाही.

ओवेसी म्हणाले, “नसीमुद्दीनचं नाव घेतलं मात्र काँग्रेस पार्टी तर बोलणार नाही. नसीमचं नाव घेतलं तर आमची मतं मिळणार नाहीत. काँग्रेस इमरानचं नाव घेणार नाही. समाजवादी पार्टी आझमचं नाव नाही घेणार मात्र आम्ही अमित शाह आणि मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, यूपीमध्ये योगी ‘राज’ (Raj) आहे. त्याचा अर्थ R (र) – रिश्वत(लाच), A – ‘अ’ अपराध(गुन्हा) किंवा आतंक(दहशत), आणि ‘J’ ‘अ’ चा अर्थ जातीवाद. अमित शाह तुमचं कर्ज फिटलं.”

ओवेसी यांनी या जाहीर सभेत हरिद्वारच्या धर्मसंसदेतील द्वेषपूर्ण वक्तव्यांचा मुद्दाही उपस्थित केला आणि ही धर्मसंसद भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडल्याचे सांगितले. देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owaisi criticizes pm modi and amit shah msr
First published on: 02-01-2022 at 13:38 IST