बलुच नेते अकबर बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अटक करण्यात येऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. बलुचिस्थान पोलिसांच्या पथकाने ६९ वर्षीय मुशर्रफ यांना अटक केली. बलुचिस्तान न्यायालयाने मुशर्रफ यांचा जामीन अर्ज काल फेटाळून लावला होता. अटकेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव मुशर्रफ यांना इस्लामाबाद जवळच्या चक शहझाद येथे त्यांच्या फार्म हाऊसवर ठेवण्यात येणार आहे. बुग्ती यांची ऑगस्ट २००६ मध्ये लष्करी कारवाई दरम्यान हत्या झाली होती. त्यावेळी अध्यक्ष आणि लष्करप्रमुख या नात्याने त्यांनी या मोहिमेचा आदेश दिले होते. बलुचिस्तानच्या स्वायत्तेसाठी बुग्ती सशस्त्र संघर्ष करत होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2013 रोजी प्रकाशित
बुग्ती हत्येप्रकरणी परवेझ मुशर्रफना कोठडी
बलुच नेते अकबर बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अटक करण्यात येऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
First published on: 14-06-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak court denies musharraf bail in bugti killing case