पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय, काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्यामुळे तिथे पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. त्यामुळे आधीच संभ्रमात असलेली पाकिस्तानची जनता आणखीनच गोंधळली आहे. एकीकडे तिन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकांशी चर्चेबाबत कोणताही पुढाकार घेतल्याचं दिसत नसताना पाकिस्तानच्या लष्करानंच पुढाकार घेतला आहे. त्याविरोधात मात्र इम्रान खान यांच्या पक्षानं देशभर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

पाकिस्तानच्या निवडणुकीत काय घडलं?

पाकिस्तानच्या संसदेत एकूण २५६ जागा आहेत. त्यात इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ आणि मित्रपक्ष(९२), नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज (७१) आणि मित्रपक्ष व बिलावल भुट्टोंचा पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मित्रपक्ष (५४) या तीन पक्षांमध्ये यातील बहुतांश जागा विभागल्या गेल्या आहेत. कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे आता अपक्षांच्या निर्णयावर पाकिस्तानमधील आगामी सरकार अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे यापैकी तिन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे.

congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

देशव्यापी आंदोलनाची हाक!

दरम्यान, पाकिस्तानमध्ये त्रिशंकू स्थिती दिसत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्करानं या सगळ्या सत्तेच्या सारीपाटामध्ये पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी नवाज शरीफ यांच्या सरकार स्थापनेच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. नवाज शरीफ यांनी सर्व लोकशाहीप्रिय शक्तींनी मिळून एकत्र सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याला लष्करानं पाठिंबा दिल्यानंतर लष्करप्रमुखांच्या या कृतीवर इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षानं तीव्र आक्षेप घेतला आहे. इम्रान खान सध्या तुरुंगात असून त्यांच्या पक्षाकडून देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे.

पाकिस्तानात निवडणूक गोंधळ, सत्तास्थापनेचं गणित काय? पंतप्रधान कोण होणार? वाचा…

“१२ फेब्रुवारी रोजी लाहोरच्या लिबर्टी चौकातून शांततापूर्ण मोर्चा काढला जाईल. लाहोरमधील सर्व जनतेनं तयार राहावं. निवडणूक निकाल जाहीर करण्यात अशा प्रकारे दिरंगाई केल्यामुळे जनतेनं दिलेल्या मताची जाहीरपणे हेटाळणी केली जात आहे. त्याचा विरोध करण्यासाठी जनतेनं एकत्र यावं”, असं आवाहन तेहरीक-ए-इन्साफ पक्षानं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

५२ मतदान केंद्रांवर पुनर्मोजणी!

दरम्यान, एकीकडे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नसताना आता एकूण ५२ मतदान केंद्रांवरील मतमोजणी पुन्हा करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एनए-८८ आणि पीके-९० या भागांमधील अनुक्रमे २६ व २५ मतदान केंद्रांवर पुनर्मोजणी केली जाणार आहे. याशिवाय पीएस-१८ येथील एका मतदान केंद्रावरही पुनर्मोजणी होईल. काही ठिकाणी निवडणूक सामग्रीची जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात आहेत. निवडणूक साहित्याचं नुकसान झाल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानात निवडणूक निकालाची अनिश्चिती; इम्रान खान, नवाज शरीफ यांच्याकडून विजयाचे दावे

चर्चेसाठी कुणाचं कुणाला निमंत्रण?

दरम्यान, एकीकडे त्रिशंकू स्थिती उद्भवलेली असताना तिन्ही प्रमुख आघाड्या एकमेकींच्या चर्चेच्या आवतणाची वाट पाहात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. बिलावल अली भुट्टो यांनी आपल्याशी नवाज शरीफ किंवा इम्रान खान या कुणाकडूनही चर्चेसाठी बोलणी करण्यात आली नसल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, नवाज शरीफ गटाकडून भुट्टोंशी आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. पक्ष म्हणून इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-पाकिस्तानला आत्तापर्यंत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, सरकार स्थापनेसाठी त्या पुरेशा नसल्यामुळे मित्रपक्ष व प्रलंबित मतमोजणीच्या जागा यावर इम्रान खान यांची भिस्त असेल.